“शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी” या उक्तीप्रमाणे कंदाच्या उतीपासून प्रयोगशाळेत स्वच्छता बाळगून कृत्रिम पोषण द्रव्यात संजीवकाच्या मदतीने या उतीचे संगोपन करून रोपे तयार करणे त्यास 'उती संवर्धन' असे म्हणतात. उती (टिश्यू) संवर्धन (कल्चर) म्हणजे वनस्पतीचा पूर्ण वाढलेला अवयव नवजात पेशी असलेला भाग. उदा. शेंडा, डोळा, पान, फूल, मूळ इ. घेऊन कृत्रिम खाद्यावर, नियंत्रित व निर्जंतुक वातावरणात वाढवणे. जगामध्ये ऊतिसंवर्धनाचा गेल्या २५ वर्षापासून व्यावसाईक उद्योगात अस्तित्वात असून, भारतामध्ये हे तंत्राद्यान सुमारे १५ वर्ष पासून कार्यरत झाले व अत्यल्प काळातच व्यावसाईक शेती क्षेत्रामध्ये दर्जेदार लागवडी युक्त रोपे उपलब्ध झाल्यामुळे क्रांतिकारक असे बदल घडून आले.
पारंपरिक रित्या शेतीसाठी पिकांची लागवड किंवा अभिवृद्धी हि बिया (लैंगिक पुनरुत्पादन -Sexual Reproduction) किंवा फुटव्यापासून (बाह्यवृधी पुनरुत्पादन - Vegetative Reproduction; प्रामुख्याने फांद्या, मुळे, डोळे, कंद व पाने इ.) या दोन प्रमुख पद्धतीने होते. बियांपासून मोठ्या प्रमाणावर लागवड हि जरी सद्यस्थितीत स्वस्त पद्धत असली तरी त्याचे काही तोटे आहेत, जसे की मातृवृक्षा प्रमाणे चांगल्या कामगिरीचे पुनरवलोकन पुढील पिढी करेलच हे नक्की नसते, बरेच बागायती पिकांना बिया/फळे येण्यास खूप वेळ लागतो तर काही पिके जननक्षम किंवा इच्छित दर्जेदार बियाणे तयार करू शकत नाही. बाह्यवृधी पुनरुत्पादन पद्धतीमध्ये वरीलप्रमाणे तोटे नसले तरीही हि पद्धत खूप जागा व वेळखावू आहे. याव्यतिरिक्त मातृवृक्षस लागण झालेले रोग पुढील पिढीमध्ये येण्याची शक्यता असते, तसेच काही पिकांमध्ये बाह्यवृधी पुनरुत्पादन पद्धत कार्यरत नसते उदा. नारळ, पपई व लवंग इत्यादी.
या व अशा अनेक कारणांमुळे शास्रज्ञामध्ये वरील दोन पद्धतींच्या तोट्यांवर मात व फाटा देऊ शकणाऱ्या वनस्पती वंशवृद्धी पद्धत शोधण्याची गरज निर्माण झाली. “गरज हि शोधाची जननी आहे” म्हणूनच साठच्या दशकात अनंत अशा अडचणींवर व असंख्य अशा चाचण्यांतून ऑर्किड या वनस्पती मध्ये व्यावसाईक उत्पादन यशस्वी झाले. ऊतिसंवर्धन तंत्राचा शोभेची झाडे, फळझाडे, फळभाज्या, मसाला पिके, औषधी वनस्पती व वनवृक्ष इ. वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अभिवृद्धी करण्यासाठी उपयोग केला जात आहे. ऊतिसंवर्धनाद्वारे तयार केलेली केळीची सारख्याच वयाची रोपे लाऊन पिकाचा कालावधी कमी करून अधिक उत्पादन घेणे शक्य होते. उसामध्ये मुलभूत रोगमुक्त बिजोउत्पादणासाठी तसेच नवीन जातीचा झपाट्याने प्रसार करण्यासाठी ऊतिसंवर्धन तंत्र महत्वाचे ठरले आहे. टिश्युकल्चरद्वारे अनेक गोष्टी साधता येतात. टिश्युकल्चर पद्धतीने रोपे अशा वनस्पतींत करतात, की ज्यांना निसर्गतः अभिवृद्धी करण्यासाठी एकापासून अनेक रोपे तयार होण्यास जास्त कालावधी लागतो. ज्या वनस्पतींची शाकीय पद्धतीने (कंद, गड्डे, डोळे) अभिवृद्धी करतात, त्याच वनस्पतीची टिश्युकल्चर पद्धतीने रोपे मिळतात. ज्या वनस्पती प्रजाती चे मानवीय किंवा वातावरणातील बदलामुळे चिंताजनक प्रजातीमध्ये अंतर्भाव आहे किंवा आयुर्वेदीय दुर्मीळ वनस्पती, अशा वनस्पतीसाठी तसेच मानवजाती साठी ऊतिसंवर्धन तंत्र वरदान आहे.
उतीसंवर्धन तंत्राची कार्यपद्धती
उतीसंवर्धन तंत्राची कार्यपद्धती
![]() |
उतीसंवर्धन तंत्राची कार्यपद्धती
|

