In 1948 population was 35 crore and 80% dependent on Farming
2019 population 125 Crore and 60 % depending on Farming
In 1948 population was 35 crore and 80% dependent on Farming
2019 population 125 Crore and 60 % depending on Farming
मन की बात...
मला आपल्या सर्वांना सांगण्यास आनंद वाटतो की तुम्ही सर्वांनी महाविद्यालय नवकल्पनाचा वापर करून आकर्षक व सुशोभित केल्यामुळे ते बघण्यासाठी इतर महाविद्यालयातुन प्राध्यापक व प्राचार्य येत आहेत.
एखादे मंदिर बांधणे तसे सोपे असते परंतु त्याचे पावित्र्य राखणे हे त्याहून अवघड. त्यामुळे आपण सर्वांनी महाविद्यालय घडवण्यासाठी जे कष्ट घेतले त्याहून अधिक कष्ट व लक्ष महाविद्यालय उंचावण्यासाठी करावे लागतील.
महाविद्यालयातील सगळ्यात महत्त्वाचे पाहिले म्हणजे सामायिक केमिकल, इक्युपमेंट व ग्लासवेर रूम. आपण सर्वाना एका छत्रा खाली सर्व वस्तू उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण व्यवस्था केली आहे, जे घेतले ते सुस्थितीत जर परत केले तर सर्वाना त्याचा फायदा होईल.
दुसरे म्हणजे प्रत्येक लॅब मधील इन्स्ट्रुमेंट, व्यवस्थित वापरले तर खराब झाले होणार नाही, खराब झाले तर श्री. गावडे याना कळवले तर लवकर रिपेअर करता येईल.
तिसरी महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालय परिसरा स्वछ ठेवणे, आपल्या महाविद्यालयात आकर्षक झाडी आहेत, आपण प्रत्येक मुलाने जर एक कुंडी दत्तक घेतली, झाडाशी मैत्री केली तर त्याची शोभा अशीच राहिल.
चौथी महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयात शिक्षण घेताना स्वतः ला झोकून देने, मनापासून शिक्षक जे सांगतील ते मनापासून करणे, आपली वर्तवणुक आपल्या पालकाणा अभिमान वाटावा अशी असावी.
महाविद्यालयात भरपूर मित्र कमावणे, एक मेकांच्या दुःखात, सुखात सामील होणे, आणि सर्वांचे अति महत्त्वाचे महाविद्यालइन जीवन एन्जॉय करणे, कारण इथून पुढील 10 वर्षांनी तुमच्याकडे पैसा असेल, सर्व असेल परंतु आठवणी कोणत्याही दुकानात विकत भेटणार नाही, त्या आत्ता कमवल्या तर नंतर आयुष्यात त्या आठवतील.
धन्यवाद