Sunday, 13 November 2016

शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी - उती संवर्धन

“शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी” या उक्तीप्रमाणे कंदाच्या उतीपासून प्रयोगशाळेत स्वच्छता बाळगून कृत्रिम पोषण द्रव्यात संजीवकाच्या मदतीने या उतीचे संगोपन करून रोपे तयार करणे त्यास 'उती संवर्धन' असे म्हणतात. उती (टिश्‍यू) संवर्धन (कल्चर) म्हणजे वनस्पतीचा पूर्ण वाढलेला अवयव नवजात पेशी असलेला भाग. उदा. शेंडा, डोळा, पान, फूल, मूळ इ. घेऊन कृत्रिम खाद्यावर, नियंत्रित व निर्जंतुक वातावरणात वाढवणे. जगामध्ये ऊतिसंवर्धनाचा गेल्या २५ वर्षापासून व्यावसाईक उद्योगात अस्तित्वात असून, भारतामध्ये हे तंत्राद्यान सुमारे १५ वर्ष पासून कार्यरत झाले व अत्यल्प काळातच व्यावसाईक शेती क्षेत्रामध्ये दर्जेदार लागवडी युक्त रोपे उपलब्ध झाल्यामुळे क्रांतिकारक असे बदल घडून आले.

पारंपरिक रित्या शेतीसाठी पिकांची लागवड किंवा अभिवृद्धी हि बिया (लैंगिक पुनरुत्पादन -Sexual Reproduction) किंवा फुटव्यापासून (बाह्यवृधी पुनरुत्पादन - Vegetative Reproduction; प्रामुख्याने फांद्या, मुळे, डोळे, कंद व पाने इ.) या दोन प्रमुख पद्धतीने होते. बियांपासून मोठ्या प्रमाणावर लागवड हि जरी सद्यस्थितीत स्वस्त पद्धत असली तरी त्याचे काही तोटे आहेत, जसे की मातृवृक्षा प्रमाणे चांगल्या कामगिरीचे पुनरवलोकन पुढील पिढी करेलच हे नक्की नसते, बरेच बागायती पिकांना बिया/फळे येण्यास खूप वेळ लागतो तर काही पिके जननक्षम किंवा इच्छित दर्जेदार बियाणे तयार करू शकत नाही. बाह्यवृधी पुनरुत्पादन पद्धतीमध्ये वरीलप्रमाणे तोटे नसले तरीही हि पद्धत खूप जागा व वेळखावू आहे. याव्यतिरिक्त मातृवृक्षस लागण झालेले रोग पुढील पिढीमध्ये येण्याची शक्यता असते, तसेच काही पिकांमध्ये बाह्यवृधी पुनरुत्पादन पद्धत कार्यरत नसते उदा. नारळ, पपई व लवंग इत्यादी. 

या व अशा अनेक कारणांमुळे शास्रज्ञामध्ये वरील दोन पद्धतींच्या तोट्यांवर मात व फाटा देऊ शकणाऱ्या वनस्पती वंशवृद्धी पद्धत शोधण्याची गरज निर्माण झाली. “गरज हि शोधाची जननी आहे” म्हणूनच साठच्या दशकात अनंत अशा अडचणींवर व असंख्य अशा चाचण्यांतून ऑर्किड या वनस्पती मध्ये व्यावसाईक उत्पादन यशस्वी झाले. ऊतिसंवर्धन तंत्राचा शोभेची झाडे, फळझाडे, फळभाज्या, मसाला पिके, औषधी वनस्पती व वनवृक्ष इ. वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अभिवृद्धी करण्यासाठी उपयोग केला जात आहे. ऊतिसंवर्धनाद्वारे तयार केलेली केळीची सारख्याच वयाची रोपे लाऊन पिकाचा कालावधी कमी करून अधिक उत्पादन घेणे शक्य होते. उसामध्ये मुलभूत रोगमुक्त बिजोउत्पादणासाठी तसेच नवीन जातीचा झपाट्याने प्रसार करण्यासाठी ऊतिसंवर्धन तंत्र महत्वाचे ठरले आहे. टिश्‍युकल्चरद्वारे अनेक गोष्टी साधता येतात. टिश्‍युकल्चर पद्धतीने रोपे अशा वनस्पतींत करतात, की ज्यांना निसर्गतः अभिवृद्धी करण्यासाठी एकापासून अनेक रोपे तयार होण्यास जास्त कालावधी लागतो. ज्या वनस्पतींची शाकीय पद्धतीने (कंद, गड्डे, डोळे) अभिवृद्धी करतात, त्याच वनस्पतीची टिश्‍युकल्चर पद्धतीने रोपे मिळतात. ज्या वनस्पती प्रजाती चे मानवीय किंवा वातावरणातील बदलामुळे चिंताजनक प्रजातीमध्ये अंतर्भाव आहे किंवा आयुर्वेदीय दुर्मीळ वनस्पती, अशा वनस्पतीसाठी तसेच मानवजाती साठी ऊतिसंवर्धन तंत्र वरदान आहे.

उतीसंवर्धन तंत्राची कार्यपद्धती


उतीसंवर्धन तंत्राची कार्यपद्धती































































Tuesday, 25 October 2016

जनुकीय सुधारित संकरीत मोहरीची अग्निपरीक्षा कि वस्रहरण....


- लेखक: अंत्रे सुरेश हरिभाऊ व प्रा. औताडे आर. एच.
दिल्ली विदयापीठाच्या साउथ कैंपस स्थित सेंटर फॉर जेनेटिक मैनीपुलेशन ऑफ़ क्रॉप प्लांट्स या विभागामधे जैवतंत्रज्ञान विभाग,नवी दिल्ली ,भारत सरकार व राष्ट्रिय दुघ्ध विकास बोर्ड यांच्या आर्थिक साहयाने जी.एम्. मोहरीची निर्मिति करण्यात आली. पारंपारिक पद्धतीमध्ये संकरीत वाण हे एकाच प्रजातीच्या परंतू अनुवांशिक दृष्ट्या भिन्न असणाऱ्या पिकांमध्ये संकर करून तयार केले जातात. मोहरीमधे पुंकेसर आणि स्त्रीकेशर हे एकाच फुलामध्ये असल्याने ते पिकाला नैसर्गिकरित्या स्वयं परागसिंचित (Self pollinated) बनवतात. इतर पिकांप्रमाणे (उदा.कापूस,टोमॅटो,गहु इ.) मोहरीमध्ये नैसर्गिकरीत्या संकर होत नाही. यावर शास्त्रज्ञांनी पारंपारीक वनस्पति प्रजननशास्त्र व आण्विक प्रजननशास्त्र यांच्या मिलाफातुन उपाय शोधून काढला आहे. बारनेज-बारस्टार या जनुकांच्या सहाय्याने हे मोहरीमधे कृत्रिमरीत्या संकर करणे शक्य झाले आहे.

जनुकीय सुधारित संकरीत मोहरीच्या वाणासाठी प्रथम पेशिद्रव्र आधारित पुरुष वंध्यत्व (Cytoplasmic Male Sterile) असलेली ‘पूसाबोल्ड’ हि जात विकसित करण्यात आली. नंतर या जातीचे ‘अर्ली हिरा-२’ या पूर्व युरोपियन (Male Fertile) जातीबरोबर संकर करून जनुकीय सुधारीत ‘डी.म्.एच.-११’ हा वाण तयार करण्यात आला.

२००३ मध्ये सुरु झालेले संशोधन आज पर्यंत भारत सरकार हे सामान्य जनते पर्यंत पोहचू शकले नाही. खालील ताख्त्यामध्ये वेगवेळ्या सरकारी संस्थांनी जनुकीय सुधारित संकरीत मोहरीच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची कालक्रमानुसार माहिती दिली आहे.



दिनांक
कार्य/घटना
१७/०९/२००३
संकरीत डी.एम्.एच.-११ मोहरीची आर.सी.जी.एम्. च्या देखरेखी खाली दिल्ली येथे प्रक्षेत्र चाचणी. २००३-०४.
१७/०९/२००४
प्रायोगिक तत्वावर मोहरीच्या जनुकीय संकरीत (जनुके- बारनेज, बारस्टार, बार इ.) बियाण्यांचे उत्पादन. ठिकाण- जौन्ति, दिल्ली, रब्बी हंगाम २००४.
२८/१०/२००४
आर.सी.जी.एम्. ने सेन्टर फॉर जेनेटिक मॅनिपुलेषण ऑफ क्रॉप प्लांट्स (सी.जी.एम.सी.पी.),नवी दिल्ली ला या संकरीत मोहरीची प्रायोगिक प्रक्षेत्र चाचणी व संशोधनासाठी उत्पादन घेण्याची परवानगी दिली. ठिकाण- प्रक्षेत्र संशोधन केंद्र, जौन्ति, दिल्ली. रब्बी हंगाम, २००४.
१/१०/२००५
आर.सी.जी.एम्. ने सी.जी.एम.सी.पी ला आणखी वेग-वेगळ्या ठिकाणी संकरीत ‘डी.एम्.एच.-११’ च्या रब्बी हंगाम प्रक्षेत्र चाचण्यांसाठी परवानगी दिली.२००५-०६.
०८/०२/२००६
केंद्रीय देखरेख पथकाकडून जनुकीय सुधारीत मोहरीच्या आर.सी.जी.एम्. च्या प्रक्षेत्र चाचण्यांची तपासणी.
२५/०२/२००६
मोनिटोरिंग एंड एवलूषण कमिटी (एम.इ.सी.) ने डी.बी.टी.ला वेग-वेगळ्या ठिकाणी, २००६-०७ या कालावधीत प्रक्षेत्र चाचण्या घेण्याची शिफारस केली. या चाचण्या राष्ट्रीय मोहरी संशोधन केंद्र, भरतपूर, च्या देखरेखीखाली अखिल भारतीय समन्वित मोहरी संशोधन प्रकल्प (ए.आय.सी.आर.पी.एम्.) येथे घेण्यात आल्या.
०१/०८/२००६
आय.बी.एस.सी.ने आर.सी.जी.एम्.ला बारनेज-बारस्टार या जनुकीय सुधारीत मोहरीच्या संकरीत बियाण्यांचे उत्पादन, विविध प्रक्षेत्र चाचण्या घेण्यासंबंधी प्रस्ताव पाठवला.
३०/१०/२००६
आर.सी.जी.एम्. ने ‘डी.एम्.एच.-११’ या वानाच्या च्या वेग-वेगळ्या ठिकाणी प्रक्षेत्रावर चाचण्यांसाठी मान्यता देण्याची जी.ई.ए.सी. ला शिफारीश केली.
०६/०२/२००७
केंद्रीय देखरेख पथकाकडून जनुकीय सुधारीत मोहरीच्या आर.सी.जी.एम्. च्या प्रक्षेत्र चाचण्यांची तपासणी.
१०/०१/२००८
आर.सी.जी.एम्. कडून अॅलर्जी, आरोग्यविषयक व इतर पर्यावरणीय दृष्टा तपासणी करण्याची परवानगी.
२००८
जैविकदृष्ट्या सुरक्षित चाचण्यांसाठी मार्गदर्शक प्रणाली. (बी.आर.एल.-१ व बी.आर.एल.-२)
२०/१०/२०१०
जैविकदृष्ट्या सुरक्षित चाचणी-१ प्रथम वर्ष (बी.आर.एल.-१)- राजस्थान मधीलतीन  ठिकाणी मर्यादित चाचणी घेण्यात आली.  १). कृषी संशोधन केंद्र, प्रायोगिक प्रक्षेत्र, नवगाव. २). कृषी संशोधन केंद्र, श्रीगंगानगर, बिकानेर. ३).के.व्ही.के. कुम्हेर. ऑक्टोबर,२०१०.
१५/१०/२०१०/ व ३०/१०/२०१०
आर.सी.जी.एम्. आणि जी.ई.ए.सी. कडून बी.आर.एल.-१ (प्रथम वर्ष) चाचणी मधे करण्यात आलेल्या अन्न आणि खाद्य संबधित मुल्यांकनाला मान्यता.
जौन्ति, दिल्ली येथे प्रायोगित तत्वावर मर्यादित बियाणे उत्पादन.
बावना, दिल्ली येथे ऑक्टोबर,२०१० कालावधीत मोहरीचा पर्यावरणीय संरक्षित अभ्यास.
०७/०२/२०११
आर.सी.जी.एम्. कडून सी.जी.एम.सी.पी. दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली च्या Brassica juncea च्या पर्यावरणीय, परागकण प्रवाह व तुलनात्मक मूल्यांकन संबंधित कार्यप्रणालीस मान्यता.
२६/०७/२०११
बी.आर.एल.-१ चा प्रथम वर्ष चा अंतरिम अहवाल आर.सी.जी.एम्.ला सादर.
१२/३/२०१२
आर.सी.जी.एम्. ची बी.आर.एल.-१ साठीच्या द्वितीय वर्ष चाचण्यांसाठी कृषी विभाग राजस्थान ची मान्यता. तीन ठिकणी मर्यादित चाचणी घेण्यात आली. १). कृषी संशोधन केंद्र, प्रायोगिक प्रक्षेत्र, नवगाव. २). कृषी संशोधन केंद्र, श्रीगंगानगर, बिकानेर. ३).के.व्ही.के. कुम्हेर. रब्बी हंगाम २०११-१२.
बी.आर.एल.-१ द्वितीय वर्ष चा अंतरिम अहवाल आर.सी.जी.एम्. ला सादर .
२२/०४/२०१४
१३३ व्या मीटिंग मधे आर.सी.जी.एम्. ने जी.ई.ए.सी. ला रब्बी २०१४-१५ साठी बी.आर.एल.-२ साठी चाचणीची शिफारीश केली.
२८/१०/२०१४
जी.ई.ए.सी.कडून बी.आर.एल.-२ साठी रब्बी २०१४-१५ प्रक्षेत्र चाचणीसाठी परवानगी. प्रक्षेत्र- पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना व प्रादेशिक संशोधन केंद्र, भटिंडा (पंजाब)
०७/११/२०१४
जी.ई.ए.सी. कडून बी.आर.एल.-२ साठी रब्बी २०१४-१५ प्रक्षेत्र चाचणीसाठी परवानगी. प्रक्षेत्र-भारतीय कृषी अनुसंधान संस्थान (आय.ए.आर.आय.),नवी दिल्ली.
०९,१०,११/०३/२०१५
केंद्रीय पालन समिती (सी.सी.सी.) कमिटीची लुधियाना, भटिंडा व आय,ए,आर,आय., नवी दिल्ली. येथील जनुकीय सुधारीत मोहरीच्या प्रक्षेत्र चाचण्यांना भेट.
१५/०९/२०१५
जुनकीय सुधारीत मोहरीच्या  ‘डी.एम्.एच.-११’ या वाण्याच्या संदर्भात जैविकदृष्ट्या सुरक्षेसंबंधी घेण्यात आलेल्या सर्व चाचण्यांचा अंतरिम अहवाल सर्व पुराव्यानिशी जी.ई.ए.सी. कडे सादर.
०५/०९/२०१६

अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार यांनी ०५/०९/२०१६ पासून ०५/१०/२०१६ पर्यंत रोजी जुनकीय सुधारीत मोहरीच्या  ‘डी.एम्.एच.-११’ बद्दल संशोधन अहवालाचा खुलासा त्यांच्या वेबसाईट वर केला.
०७/१०/२०१६
न्यायालयाने जीएम मोहरी वाणाच्या व्यावसाईक लागवडीच्या प्रक्षेत्र चाचणीस १७/१०/२०१६ पर्यंत स्थगिती दिली व ती वाढवून २४/१०/२०१६ पर्यंत केली.

Monday, 22 August 2016

वाढती भूक, घटणारे शेती क्षेत्र आणि लहरी निसर्ग – याला पर्याय काय?

पूर्वीच्या सधन आणि समाधानी असलेल्या शेतकर्याची चुकलेली वाट सध्या आत्महत्ये पर्यंत येवून का ठेपली? जगाचा पोशिंदा आज उपाशी का? पूर्वीचे उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ट नोकरी हे समीकरण का बदलले? जगाची वाढती भूक, घटणारे शेतीखालील क्षेत्र व त्या पाठोपाठ पडणाऱ्या दुष्काळाचे सावट या समस्या ना फक्त शेतकरीच तोंड देणार का? त्याला ह्या ब्रम्ह संकटातून कोण सोडवणार?  
वरील बहुतेक प्रश्नांचे उत्तर हे दुसरी हरितक्रांती ठरू शकते. पहिल्या हरितक्रांतीतील उणीवांचे उत्तर हे सुद्धा दुसर्या हरितक्रांती मध्ये दडलेले आहे. भारताचा कृषि क्षेत्रातील विकास खरे तर स्वातंत्र्यानंतर सुरु झाला, त्यामध्ये “हरितक्रांतीचा” मोलाचा वाटा होता. आधुनिक शेती तंत्रज्ञान, अधिक उत्पादन क्षमता असलेले वाण त्याच बरोबर रासायनिक खते, कीटकनाशके व सिंचनाचा वाढता वापर हरीत्क्रांतीस कारणीभूत ठरले.  
तसे पाहिले तर जैवतंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ पहिल्या हरितक्रांतीच्या वेळी नकळतच रोवली गेली. त्यावेळी पहिल्यांदाच पारंपारिक संकरीकरनातून अपेक्षित व अचूक जनुके हस्तांतरित करून गव्हाचे उत्पन्न वाढविण्यात डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी यश मिळविले. १९६४ ते १९७० ह्या कालावधीत डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी त्यांच्या मदतीने नवीन व विकसित गव्हाचे वाण भारतामध्ये आणले, त्यामुळे भारताचे गव्हाचे सरासरी उत्पादन द्विगुणित झाल्यामुळे भारत हा गव्हाची आयात न करता निर्यात करणारा देश झाला. स्वातंत्र्य काळात अन्नटंचाईला सामोरे जाणाऱ्या देशाला या क्रांतीने अन्नाच्या बाबतीत सुबत्ता मिळून दिली.  त्यावेळीसुद्धा गव्हाची हि नवीन विकसित वाणे भारतामध्ये अंतर्भूत करण्यास डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना स्थानिक शेतकऱ्यांकडून खूप विरोध झाला. विरोध इतका विकोपाला गेला कि भारत सरकारला त्यांमध्ये लक्ष घालणे भाग पडेले, व त्यानंतर डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचे संशोधन चालू झाले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, त्यामुळे एखादी नवीन गोष्ट येथे अंतर्भूत करायची झाल्यास त्यासाठी विरोध होतो. जसे कि, जैवतंत्रज्ञानाच्या वाट्याला हा विरोध त्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. हा विरोध भारतातच नव्हे तर जगभरात जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेल्या उत्पादनाला झाला. परंतु, जगातील बहुतेक देश आता हि उत्पादने वापरान्यास पुढे येत आहेत, त्यासाठी ह्या देशांनी जैवतंत्रज्ञान हे कसे सुरक्षित व उपयोगी आहे ह्याच्या प्रचारासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्या तुलनेत भारताला फार लांबचा पल्ला गाठायचा आहे.
जैवतंत्रज्ञानची व्याख्या: सजीवांमधील पेशीच्या गुणसुत्रांमध्ये किंवा त्याद्वारे चयापचय क्रियेत मानवाच्या गरजेनुसार सजीवाच्या सध्याच्या स्थितीत अथवा त्यात बदल घडवून उपयुक्त उत्पादने तयार करण्याच्या तंत्राला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. नवीन उपयुक्त जनुक शोधून ते शेतीउपयोगी सुधारीत पीक, प्राणी व सुक्ष्म जीव जातींमध्ये अंतर्भूत करण्यासाठीसुद्धा या तंत्राचा वापर केला जातो; त्यालाच कृषी जैवतंत्रज्ञान असे म्हणतात व त्यातून मानवनिर्मित फायदेशीर आणि सुधारित सजीवाला ‘जेनेटिकली मोडीफाईड ऑरगॅनिज्म्स’ ( जी एम ओज)  असे म्हणतात.  उदा. भातामधील 'अ' जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्याच्या जनुकात बदल करून शास्त्रज्ञांनी 'गोल्डन राइस' ही जात विकसित केली. अतिउपयुक्त सजीव निर्मितीसाठी पेशीस्थरावर अपेक्षित गुणधारी जनुक ओळखून ‘अनुवंशिक अभियांत्रिकी” तंत्राच्याद्वारे सुधारणेस पात्र सजीवात अंतर्भूत करण्याचे तंत्र आतिशय क्लिष्ट व वेळखाऊ असते. संकर (हायब्रीड) तंत्रज्ञानाचा पुढचा आविष्कार म्हणजेच जैवतंत्रज्ञानद्वारे आनुवंशिक बदल (Genetic Manipulation/Modification) घडवणे.

कृषी जैवतंत्रज्ञानाचा पिकांमध्ये अंतर्भाव करणारे; भारत व ईतर राष्ट्रे.

भारत
अमेरिका
चीन
कॅनडा
ब्राझील, द. आफ्रिका, पराग्वे व अर्जेंटिना
बांगलादेश
कापूस
कापूस
अल्फाल्फा
कापूस
मका
कापूस
वांगे

मका
सालमोन मासा
पपई
सोयाबीन
मका


सोयाबीन
डांगर
पोरोसा पिंपल
मोहरी
सोयाबीन


मोहरी
पपई
टोमॅाटो
साखर कंद



साखर कंद
सफरचंद
ढोबळी मिरची