कवी: सहजी ऋषीकेश औताडे, श्रीरामपूर, अहिल्यानगर (9960553407)
*टीप: हलक्या दिलाच्या पुरुषाने वाचू नये*
👰🏻♀️ बायको म्हणजे, बायको असते
बऱ्याच नवऱ्याच्या मते सायको असते 😅
बरोबरच आहे, तुमच्या सारख्या गणमन्यासंगे ती राहत असते 😜
👣 संसाराच्या मोहपाश्यात लोळणारे, तुम्हाला ती समाजात चालायला शिकवते 👩🏫
खूप त्रास देते म्हणून बोंबलू नका 😤
उद्धार करणारी ती तुमची यशोदा माई असते 👩👦
🎭 बरेच कौटुंबिक निर्णय पडद्याआड तीच घेते असते
पडदा पडला की, तुमच्या फुशारक्यांना हसत अनुमोदन देत असते 😌👏
⚖️ दोन दोन आईवडलांची जबाबदारी, तराजू न लावता घेत असते
तुमचा तराजू तर एकीकडे झुकतो, दुसरीकडे डोळेझाक असते 🙈
💔 कितीही अन्याय करा तिच्यावर, ती तुमच्यावरच अडकलेली असते
न्याय मागणार कुणाकडे, कन्यादान मुळे तिचे माप नेहमी झुकते असते 🎗️
🧹 दिवसभर खांद्याला खांदा लावून, ती राबत असते
जरा विरंगुळा म्हणून ती बसली, की सगळ्यांची भुवई उंचावते 😒☕
🌺 सर्व देवी देवताना जन्म देणारी आदिशक्ती स्वरूप ती असते
जिथे तिचा सन्मान होईल, त्या घरातच सुबत्ता नांदत असते 🏡✨
🕯️ तुमच्या घराला दिव्य करण्यासाठी, स्वतः चे घर अंधारून आलेली असते
बाहुबली सारखे स्वागत करा तिचे, त्यातच तुमची मर्दानगी दिसत असते 💪❤️
🤝बायकांनो कविता वाचल्याप्रमाणेच, वागायचे असते🫡
नाहीतर "नवरा म्हणजे, नवरा असतो" अशी कविता सुचतच असते 🫣