छत्रपती शिवाजी महाराज,
स्वराज्यासाठी सांडलेल्या प्रत्येक रक्ताची शपथ घेऊन सांगतो हा मावळा...
नाही वाजवणार डी जे किंवा मोठ्या आवाजात गाणं, दाखवणार माज्या वागणुकीतून कसा राखला जातो आमच्या छत्रपतींचा माणं.
माता, भगिनींना आपले राज्य होते निर्भय, तुमचा संदेश रक्तात भिनविल सर्वांच्या, वाकड्या नजरेने पाहणाऱ्याची आता नाही होणार गय.
आजचा युवक जातो आहे व्यसनाच्या आहारी, महाराज सांगतो सिंह गर्जना करून अरे यांचं साठी कारे केली आपल्या तानाजीने कोंढाण्यावर स्वारी.
आजचा युवक विद्यार्थी दशेतच बघतो प्रेम, लग्नाची स्वप्ने, सांगतो त्यांना महाराज लोखंड तापावल्यावरच त्याची तलवार होते, महाराज आपण लढला लहान पोर वयात पाहत होता स्वराज्याची स्वप्ने.
आजचा युवक आपल्या जन्म दिनी घसा कोरडा होईस्तोवर घोषणा देतो, परंतु माय, भगिनी वर होणाऱ्या जाळपोळ व ऍसिड हल्ल्यानंतर त्याचा आवाज का बसतो, सांगतो त्यांना शिवराय नाही जाणवणार, नका नुसता आवाज भरू, कर्तव्याची सिंहगर्जना लागते, या सारे भयमुक्त स्त्री शक्ती निर्माण करू.
विनंती करतो महाराज पुन्हा एकदा द्या साद या युवकांना अंगात त्यांच्या शिव-संचारला जाईल, शपथ घेतो आई भवानी मातेची आजच काय आयुष्यातला प्रत्येक दिवस या युवा मावळ्यांच्या रुपात आपला पुनर्जन्म होईल.
प्रभारी प्राचार्य
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,
लोणी