Monday, 23 June 2025

*कविता: बायको म्हणजे, बायको असते*

कवी: सहजी ऋषीकेश औताडे, श्रीरामपूर, अहिल्यानगर (9960553407)

*टीप: हलक्या दिलाच्या पुरुषाने वाचू नये*

👰🏻‍♀️ बायको म्हणजे, बायको असते
बऱ्याच नवऱ्याच्या मते सायको असते 😅
बरोबरच आहे, तुमच्या सारख्या गणमन्यासंगे ती राहत असते 😜

👣 संसाराच्या मोहपाश्यात लोळणारे, तुम्हाला ती समाजात चालायला शिकवते 👩‍🏫
खूप त्रास देते म्हणून बोंबलू नका 😤
उद्धार करणारी ती तुमची यशोदा माई असते 👩‍👦

🎭 बरेच कौटुंबिक निर्णय पडद्याआड तीच घेते असते
पडदा पडला की, तुमच्या फुशारक्यांना हसत अनुमोदन देत असते 😌👏

⚖️ दोन दोन आईवडलांची जबाबदारी, तराजू न लावता घेत असते
तुमचा तराजू तर एकीकडे झुकतो, दुसरीकडे डोळेझाक असते 🙈

💔 कितीही अन्याय करा तिच्यावर, ती तुमच्यावरच अडकलेली असते
न्याय मागणार कुणाकडे, कन्यादान मुळे तिचे माप नेहमी झुकते असते 🎗️

🧹 दिवसभर खांद्याला खांदा लावून, ती राबत असते
जरा विरंगुळा म्हणून ती बसली, की सगळ्यांची भुवई उंचावते 😒☕

🌺 सर्व देवी देवताना जन्म देणारी आदिशक्ती स्वरूप ती असते
जिथे तिचा सन्मान होईल, त्या घरातच सुबत्ता नांदत असते 🏡✨

🕯️ तुमच्या घराला दिव्य करण्यासाठी, स्वतः चे घर अंधारून आलेली असते
बाहुबली सारखे स्वागत करा तिचे, त्यातच तुमची मर्दानगी दिसत असते 💪❤️

🤝बायकांनो कविता वाचल्याप्रमाणेच, वागायचे असते🫡 
नाहीतर "नवरा म्हणजे, नवरा असतो" अशी कविता सुचतच असते 🫣

Thursday, 23 July 2020

Man ki bat in lockdown

*Man ki bat*
Dear students,
Your at middle of your career, you are educated, you can learn, read, write and speak. Since, lockdown you are safe at your home under the protection (financial, emotional & social) of your parents.

Many families/ parents are suffering with financial problems, many times parents keep this issue away from their sons/daughters. But as you are educated and there are many opportunities in lockdown (if you find it), where online/ offline you can earn and give support to your family (Eg. Helping in farm work, helping in selling of farm produce). If not that, start preparing for future opportunities/ exams / career goals (Have some Goal in mind, work on your SWOT). Don't be inactive/ blank in lockdown. 

Everyday many things come before you, decide priorities which can help you to achieve your goals.

*Be safe and take care*

Tuesday, 30 June 2020

संचारलेले विचार



छत्रपती शिवाजी महाराज,
स्वराज्यासाठी सांडलेल्या प्रत्येक रक्ताची शपथ घेऊन सांगतो हा मावळा...

नाही वाजवणार डी जे किंवा मोठ्या आवाजात गाणं, दाखवणार माज्या वागणुकीतून कसा राखला जातो आमच्या छत्रपतींचा माणं.

माता, भगिनींना आपले राज्य होते निर्भय, तुमचा संदेश रक्तात भिनविल सर्वांच्या, वाकड्या नजरेने पाहणाऱ्याची आता नाही होणार गय.

आजचा युवक जातो आहे व्यसनाच्या आहारी, महाराज सांगतो सिंह गर्जना करून अरे यांचं साठी कारे केली आपल्या तानाजीने कोंढाण्यावर स्वारी.

आजचा युवक विद्यार्थी दशेतच बघतो प्रेम, लग्नाची स्वप्ने, सांगतो त्यांना महाराज लोखंड तापावल्यावरच त्याची तलवार होते, महाराज आपण लढला लहान पोर वयात पाहत होता स्वराज्याची स्वप्ने. 

आजचा युवक आपल्या जन्म दिनी घसा कोरडा होईस्तोवर घोषणा देतो, परंतु माय, भगिनी वर होणाऱ्या जाळपोळ व ऍसिड हल्ल्यानंतर त्याचा आवाज का बसतो, सांगतो त्यांना शिवराय नाही जाणवणार, नका नुसता आवाज भरू, कर्तव्याची सिंहगर्जना लागते, या सारे भयमुक्त स्त्री शक्ती निर्माण करू.

विनंती करतो महाराज पुन्हा एकदा द्या साद या युवकांना अंगात त्यांच्या शिव-संचारला जाईल, शपथ घेतो आई भवानी मातेची आजच काय आयुष्यातला प्रत्येक दिवस या युवा मावळ्यांच्या रुपात आपला पुनर्जन्म होईल.

प्रभारी प्राचार्य
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,
लोणी

Tuesday, 25 February 2020

Senior - Junior

Seniors are called Sir, because if you don't call they won't hear.

Seniors don't do mistakes, because they have gone through many checks.

Seniors gives orders, because they are responsible for protecting the borders.

Seniors makes you laugh, because if you don't be ready for their rap.

Seniors behaves as a mature guy, because they have experienced the immature try.

Seniors are getting paid well, because they had made heaven out of hell.

Seniors should protect their fellow, because juniors would get way to follow.

Seniors should not behave as a horror, because juniors would see them as their mirror.

Senior-junior shouldn't corner each other, because vision gets blurred when everyone looses honor.

Prof. R. H. Autade

Friday, 14 February 2020

व्यापारी शेत-करी

व्यापारी शेत-करी

शेती व्यवसाय होता, बळीराजा व्यावसायिक होता तू,
मातीचा देह तुझा रुद्धय पाझरते तुझे व्यापारी नाही होऊ शकला तू?

शेतीचे झाले व्यापारीकरण, विठ्ठल होता तू
विठ्ठलच राहिला, व्यापारी नाही होऊ शकला तू?

शेतमाल विकण्यासाठी जेव्हा बाजार मांडतो तू,
विकण्यासाठी आवाजाचा आकांडतांडव करतो तू,
ग्राहक जेव्हा देवासारखा तुज्या समोर येतो, हात जोडून खुशाल दोन पैसे कमी घेतो तू?

दुकानात गेलास तर, व्यापारीच्या भिंतीवर असते आज नगद कल उधार तू, परंतु तुझे उलटे असते सगळे  बाबा जसे आज उधार, कल नगद घेतो तू?

शेतमालाचा बाजार भाव वाढला, कणा ताठ मानेने उभा राहतो तू, शेतमाल बाजार भाव पडला डोळ्यात पाणी आणून रडतो तू?

आधुनिक शेत आणि व्यापार आपल्या मुलांना यावा यासाठी कृषी महाविद्यालयात त्यांना घालतो तू, परंतु शिक्षण घेऊन जेंव्हा मुलगा तुला सोडून जातो तरी आशीर्वाद देतो तू?

उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही एकटाच लढतो तू, परंतु लढता लढता मृत्यू आला तरी बलिदान दिले म्हणून गणला जात नाही तू?

म्हणून सांगतो तुला शेतकरी दादा एकत्र येऊन गट शेती करशील का तू, शहाराकडे जाणाऱ्या नवयुवकांच्या रस्त्याला बार लावणार का तू?

Thursday, 6 February 2020

Be true sportsman

Then it's not a sport's if we teachers interfere with Umpire. Sachin Tendulkar never question the decision of umpire, even if it's wrong. He always accepted it and gave answers with his performance not with words or behavior. Sportsmanship always wins. Sports secretary has great responsibility to keep motivating the all team even if decision go against the team. Performance always speak, accept the injustice with positive attitude. Positive attitude always help. Injuries are part of sports.  Good Night, I wish speedy recovery of injured sportsman.

Taking one step back doesn't mean you lost everything or you run away. I don't know what you took message from Film Tanaji. Shivaji Maharaj had to give 22 forts to Mirjha Raje Jaisingh but later he took away every fort from him. That's the teaching of Shivaji Raje , that's the legacy of Shivaji Raje, that's the way shown to future generations of India by Shivaji Raje. Simple message Keep calm and carry on.

Monday, 6 January 2020

महाविद्यालय म्हणजे ज्ञानमंदिर...

महाविद्यालय हे ज्ञानमंदिर असून तेथे दोन गोष्टी प्रामुख्याने खालील देवतांच्या कृपेने घडतात...

१. सरस्वती - ज्ञानदान
२. लक्ष्मी - कर्मचारी यांचा प्रपंच घडणे

आशा पवित्र ठिकाणी जर आपल्या महाविद्यालयातील कर्मचारी धूम्रपान करून वरील देवतांचा अपमान करत असतील तर त्यास गुरुर ब्रम्हा, विष्णू आणि महेश देखील वाचवू शकणार नाहीत. जे कर्मचारी असे करत असतील त्यांना वाचवणे आपले कर्तव्य असून, त्यादृष्टीने त्यांना आपण मदत करूया.

Thursday, 26 December 2019

Good Morning with Handshake

मन की बात :-
Saying Good Morning is the most beautiful thing you can do when you first meet a person who is senior to you with respect to Age and Knowledge.

Handshake is the way of Non-verbal communication and when you do the handshake you can understand the personality of the person.

So, from today I determined that When I would enter first time in College, everyday, whoever I meet in the way up to my office I would greet the students Good Morning with Hand shake.

I will not do above with the students who has not following dress code and I Card.

I/c Principal

Tuesday, 26 November 2019

Think and Make a difference

All holiday enjoying students holidays are great time to learn something new out of books and will useful for future life. College ground is ready. You can form a cricket team play match in morning take a rest afternoon and again play practice in evening. Have a good time out of class with yout friends, visit college if you want to get involved in College internship, but don't waste time at home. Those students want to help their parents at home in farming can continue with it. We have opened the 24 x 7 open library you can come read, if you read a book and submit one page summary to us, College would give certificate for the same.

Think and make difference.
I/c Principal

Sunday, 24 November 2019

Happy Journey

All students don't disappoint us by on the spot tour cancellation tomorrow morning. It's not just a tour but opportunity for all of the classmates to come together at last time and enjoy a bit. All skills will be tested during the tour. Be cooperative to each other and listen to your teacher and keep discipline during company visit. Follow the time and schedule to get maximum out of the tour. Do not go anywhere without informing your teachers and be alert during train journey. Take care of each other, encourage us by taking efforts to make this tour successful so future we would organise such long tours for your juniors.

All students keep your and College  image clean and neat during educational visit. Create enjoyable and good memories and follow the instructions of teachers. Show professional behavior while company visit. Good day ahead.

Hope your class show unity as last time. As train will start from Pune at 11:00 AM you all should reach there before one hour.

Happy journey and Happy Learning.

Monday, 21 October 2019

जनुकीय सुधारित वाणांच्या परवानगीबाबतीतच अग्निपरीक्षा का असावी?





सध्याच्या लोकसंख्या वाढीच्या गतीनुसार २०५० मध्ये जगाची लोकसंख्या सध्याच्या ७.२ अब्जा वरून ९.६ अब्ज होण्याचा अंदाज आहे. या वाढीव लोकसंखेचे पोट भरण्यासाठी मनुष्यजातीला अन्नधान्याचे उत्पादन सध्याच्या उत्पन्नापेक्षा ६० % पर्यंत वाढवावे लागेल.  (जी. एम.) जनुकी परिवर्तीतीत पिकांमध्ये शाश्वत उत्पादनवाढीसाठीची क्षमता आहे हे मागील तीस वर्षात सिद्ध झाले आहे. बदलत्या वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता असलेल्या पिकांच्या वनांमध्ये अजैविक तणाव सहनशीलता, बदललेली वाढ / उत्पन्न, रोग प्रतिकार, तणनाशक सहनशीलता, कीटकांचा प्रतिकार, सुधारित उत्पादन गुणवत्ता व परागकण नियंत्रण यंत्रणा इ. व्यावसायिक जीएम वैशिष्टे उपलब्ध आहेत. १९९६ साला पासून जनुकी परिवर्तीतीत पिकांचे व्यावसायिक लागवडीसाठीची सुरुवात झाली व पुढील काळात त्यांच्या जागतिक लागवडीत १०० पतीने वाढ झाली. गेल्या दोन दशकात जवळपास २६ देशांनी जनुकी परिवर्तीतीत पिकांचा अंतरभाव केल्यामुळे जी.एम. पिकांची लागवड आता १९१.७ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. जगामध्ये आधीच ८७० दशलक्ष लोकांना खाण्यासाठी पुरेसे अन्नधान्य मिळत नाही व २ अब्ज लोक हे कुपोषणाच्या छायेत आहेत. हि सर्व आकडेवारी चिंताजनक आहे व त्यावर जी.एम. पिकांचा वापर चांगला पर्याय आहे. भारतात बी. टी. जी. एम. कापूस तंत्रज्ञान प्रसारित होण्यापूर्वी व वान प्रसारित झाल्यानंतर विरोध झाला. त्यामुळे देशामध्ये बी.टी. कपाशी वान सोडता इतर कोणताही जी. एम. वान तयार असूनही प्रसारित होऊ शकला नाही. हा विरोध भारतातच नव्हे तर जगभरात जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेल्या उत्पादनाला झाला. परंतु, जगातील बहुतेक देश आता हि उत्पादने वापरान्यास पुढे येत आहेत, त्यासाठी ह्या देशांनी जी.एम. तंत्रज्ञान हे कसे सुरक्षित व उपयोगी आहे ह्याच्या प्रचारासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्या तुलनेत भारताला फार लांबचा पल्ला गाठायचा आहे. भारतामध्ये जी. एम. तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या लोकांच्या आक्षेपापैकी एक आक्षेप, तो म्हणजे जी. एम. पिकांना मान्यता देणाऱ्या शासकीय किंवा खाजगी संशोधन संस्था बद्दल असलेला गैरसमज (ह्या संस्था मोठ मोठ्या बहुराष्ट्रीय जैवतंत्रज्ञान कंपन्यांच्या कठपुतली आहे). तोच गैरसमज दूर करण्यासाठी खालील माहिती नमूद करत आहोत.  

गेल्या काही वर्षांपासून पिकांवर वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामध्ये ऊस पिकांवर आलेला लोकरी मावा व हुमणी अळी, मका पिकावरील लष्करी अळी, कापसावरील गुलाबी बोन्ड अळी व लष्करी अळी, सोयाबीन वरील वेगवेगळ्या अळ्या. वातावर बदलामुळे कीटक व अळ्या आपले उपजीविकेचे पारंपरिक पिके सोडून इतर पिकांवर हल्ला चढवत आहे. या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषध फवारणी करावी लागतात परंतु तरीही प्रादुर्भाव आटोक्यात येत नाही. असेच काही कपाशीच्या व वांग्या च्या बाबतीत होत होते परंतु जनुकिय सुधारित कपाशी व वांगे पिकांमध्येच जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रतिकार शक्ती निर्माण केल्यामुळे बाहेरून काही उपाय न करता कीड आटोक्यात आली व उत्पादन वाढले. 

सध्या ७० देशांमध्ये जी. एम. वाणांची पिके घेतली जातात तर त्यातील काही प्रत्यक्ष मानवी आहारात वापरली जात आहेत व काही प्रत्यक्ष आहारात नसली तरी त्यांच्या पासून प्रक्रिया केलेले पदार्थ आहारात वापरले जात आहेत.   उदा. कपाशी, सोयाबीन, मका, मोहरी, बिट, पपई, वांगे, सफरचंद व बटाटा इ. परंतु भारतात गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनातून पुढे आलेल्या जी. एम. वाणांची पिके वापरण्यावर सरकारने बंदी घातली आहे, त्यामध्ये अनेक नामवंत शास्रज्ञानी संशोधन करून निर्माण केलेले जी. एम. मोहरी वाण सर्व सुरक्षा चाचण्यामधून सुरक्षित सिद्ध होऊनही भारत सरकारने शेतकऱ्यांना वापरासाठी हिरवा कंदील दाखवला नाही. 

(जी. एम.) जनुकी परिवर्तीतीत पिकांच्या सुरक्षितता प्रणालीचा इतिहास
१९७० च्या दशकात पुन: संयोजन डीएनए तंत्रज्ञानाचा (रीकॉम्बिनंट डीएनए टेकनॉलॉजी) उगम झाल्यापासून त्यावेळच्या शास्रज्ञा मध्ये पुन: संयोजन डीएनए तंत्रज्ञान किंवा जनुकीय अभियांत्रिकी शाखेमध्ये सुरु झालेल्या प्रयोगातून संभावित धोक्यांची चर्चा सुरु झाली. या चर्चेतील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे होते.
१.      त्यावेळच्या शास्रज्ञ ह्या नवीन सामोऱ्या येणाऱ्या तंत्रज्ञानमधील बदलासाठी पुरेसे अनुभवी किंवा तयार नाहीत.
२.     पुन: संयोजन डीएनए तंत्रज्ञानातून तयार होणारा सजीव हा कसा असेल याचे भाकीत कोणीही काढू नाही व त्यामुळे नवीन काहीतरी भयकृत तयार होईल.
३.     संकरीत सजीव हा प्रयोगशाळेतून निसर्गामध्ये जाऊन इतर सजीवांना हानीकारक ठरू शकतो व निसर्गातील बदलांना कसा प्रतिसाद देईल याचे भाकीत करणे कठीण आहे.
या व अशा सर्व मुद्द्यांची व आक्षेपांची दखल व सविस्तर चर्चा सर्वात आधी १९७४ साली नेशनल अकॅडमी ऑफ सायन्स, युएसए येथे “रीकॉम्बिनंट एडव्हायजर कमिटी” ची स्थापना करून त्याद्वारे सुरक्षासंबंधित काही शिफारशी  करण्यात आल्या.
त्यानंतर १९७५ साली अलीसोमार, कॅलिफोर्निया येथे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त सभेत वरील सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चेतून सर्वात पहिल्या रीकॉम्बिनंट डीएनए टेकनॉलॉजी शाखेमध्ये सुरक्षा संचाची सूत्रबद्ध मांडणी करण्यात आली.
हे सर्व प्रयत्न म्हणजे अमेरिका व इतर काही देशांमध्ये जीवसुरक्षा (बायोसेफ्टी) या विषयाची उत्तरवर्ती मार्गदर्शक व नियमन तत्वांची पायाभरनी करण्यासाठीची सुरुवातच होती.
त्यानंतर १९७५ मध्ये एनआईएच (नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, अमेरिका) ह्या संस्थेने सर्वप्रथम सर्वसमावेशक अशी रीकॉम्बिनंट डीएनए टेकनॉलॉजी शाखेमध्ये शास्रीय प्रयोग करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे तयार केली. सद्यस्थितीत अमेरिकेमध्ये  रीकॉम्बिनंट डीएनए टेकनॉलॉजी  व जनुकीय परिवर्तीत पिके संशोधनावर एनआईएच च्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे नियंत्रण ठेवले जाते.
जीवसुरक्षा (बायोसेफ्टी) म्हणजे जनुकी परिवर्तीत सजीवाच्या विकासासाठी व व्यावसाईकिकरण करते वेळी समाज व निसर्गाच्या सुरक्षेसाठी शास्रीय धोरनांचा व कार्यप्रणालीचा अंतर्भाव करणे. जैवतंत्र किंवा त्यापासून मिळणाऱ्या उत्पनादापासून संभावित धोके असू शकतात का? अनेक चाचण्या अंती परवानगी मिळण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे पाळावी लागतात त्याला जीवसुरक्षा (बायोसेफ्टी) असे म्हणतात.
पहिले जनुकीय परिवर्तीत तंबाखू हे १९८३ मध्ये तयार झाले व त्याचे चीन ह्या देशाने १९९६ मध्ये २.५ लाख एकर क्षेत्रावर लागवड करून पहिल्यांदा जनुकीय परिवर्तीत पिकाचे व्यावसायीकिकरण केले,  त्यानंतर वाढीव पोशनमुल्य व विलंबित परिपक्वता हे गुणधर्म असणारे पहिले अन्न पिक फ्लार्वसार्व (FlavSarv) टोमाटो पिक अमेरिकेने १९९४ साली बाजारपेठेत उतरवले.  इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये १९८५ ते १९९० साला दरम्यान जनुकीय परिवर्तीत जीव व पुन: संयोजन डीएनए तंत्रज्ञाना संदर्भातील संशोधन सुधारण्यासाठी व ते तपासण्यासाठी सर्वकष नियमन यंत्रणा हळू हळू विकसित होण्यास सुरुवात झाली.
भारतामध्ये जनुकीय परिवर्तीत पिकांच्या व्यावसाईक उत्पादन करण्याच्या परवानगीसाठी “केंद्रीय पर्यावरण व अरण्य मंत्रालय’ हे मध्यवर्ती साधन म्हणून काम पाहते. पर्यावरणामध्ये सुधारणा, त्याच्या संरक्षण देण्यासाठी व त्यासंबधी समस्या सोडवण्यासाठी “केंद्रीय पर्यावरण व अरण्य मंत्रालयाने” पर्यावरण व संरक्षण कायदा (EPA), १९८६, नियम १९८९ हा अमलात आणला गेल्यामुळे संशोधन क्षेत्र व जनुकीय परिवर्तीत जीवांचा मोठ्या प्रमाणावर उपाययोजना व त्यापासून मिळणारी उत्पादने या सर्व बाबी त्याच्या अखत्यारीत आल्या.
भारत हा जागतिक स्तरावर पहिला असा देश होता कि, ज्याने विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत स्वतंत्र असा जैवतंत्र विभाग (डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी) नवी दिल्ली येथे १९८६ साली स्थापन करून जैवतंत्र क्षेत्रात भविष्यात लागणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसित करणे, संशोधनासाठी लागणाऱ्या इमारती सुविधा व आर्थिक मदत व जैवतंत्रज्ञान विषयाची व त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची जनजागृती करण्याच्या कामाला गती दिली.
त्यानंतर जैवतंत्र विभागाने (डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी) पुन: संयोजन डीएनए तंत्रज्ञानाचा (रीकॉम्बिनंट डीएनए टेकनॉलॉजी) वापर संशोधनात करण्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे १९९० साली तयार केली व ती नंतर १९९४ साली परिष्कृत केली. 
जनुकीय परिवर्तीत प्राणी, पिके व सूक्ष्मजीव तयार करताना किंवा त्यावर संशोधन करतना कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून वेळो वेळी भारत सरकारने खालील प्रमाणे विविध मंडळे व समित्या स्थापन करून त्यावर काटेकोर व्यवस्थापन करण्यासाठी जगविख्यात व त्या क्षेत्रात अनुभवी अशा शास्रज्ञाची नेमणूक केली. जनुकीय परिवर्तीत पिकांबद्दल निर्णय निरपेक्ष व्हावा ह्यासाठी समित्यांमध्ये विविध स्तरावर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती समाविष्ट असतात.




१.     पुन: संयोजन डीएनए  (रीकॉम्बिनंट डीएनए) सल्लागार मंडळ  
(Recombinant DNA Advisory Committee - RDAC)
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जैवतंत्रज्ञानातील सुधारणांचा पाठपुरावा व सुधारित सुरक्षा नियमांची वेळोवेळी शिफारस करण्यासाठी जैवतंत्र विभागाने (डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी) पुन: संयोजन डीएनए  (रीकॉम्बिनंट डीएनए) सल्लागार मंडळ  (RDAC) स्थापन केले आहे.

•        संस्थास्तरीय जीवसुरक्षा मंडळ
(Institutional Biosafety Committee - IBSC)
आनुवंशिक परिवर्तीतीकरनाचाचा उपयोग संशोधनामध्ये करणाऱ्या संस्थासाठी संस्थास्तरावर “संस्थास्तरीय जीवसुरक्षा मंडळ” स्थापन करून व तसेच जैवतंत्र विभागचा नामनिदेर्शित व्यक्तीची नेमणूक करून हे मंडळ वैज्ञानिक व संशोधकाच्या परस्पर संपर्कासाठी मध्यवर्ती बिंदू म्हणून काम करते.
या मंडळांतर्गत खालीलप्रमाणे उपक्रम राबविले जातात
१.     पुन: संयोजन डीएनए  (रीकॉम्बिनंट डीएनए) वरील संशोधनाची नोंद घेऊन त्याला परवानगी देणे.
२.   पुन: संयोजन डीएनए तंत्रज्ञान (रीकॉम्बिनंट डीएनए टेक्नोलॉजी) विषयीचे भारत सरकारच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वांना अनुसरून संशोधन होत आहे याची खात्री करणे.
३.     गरज पडल्यास मार्गदर्शक तत्वांनुसार आणीबाणी परिस्तिथी तयारी करणे.
४.  आनुवंशिक हाताळणी पुनरावलोकन मंडळला वर्ग तीन मधील जोखमीबद्दलची शिफारस करणे किंवा प्रयोगासाठी मंडळाची परवानगी मागणे.
५.    वैधानिक समितीनमधील सुसंवाद होण्यासाठी केंद्र बिंदू म्हणून काम करणे.
६.     मान्यताप्राप्त कार्यप्रणाली नुसार नेमलेल्या जागेवर होणारऱ्या प्रयोगांची खात्री करणे.

·       आनुवंशिक हाताळणी पुनरावलोकन मंडळ
Review Committee on Genetic Manipulation (RCGM)
जैवतंत्र विभागाने स्थापन केलेले आनुवंशिक हाताळणी पुनरावलोकन हे पुढील उच्चस्तरीय मंडळ असून त्याच्या खालीलप्रमाणे  नमूद केलेल्या जबाबदारऱ्या आहेत.
1.       जनुकीय परिवर्तीत सजीवांवर संशोधन करण्यासाठीची मार्गदर्शक पुस्तिका तयार करणे.
2.    पुन: संयोजन डीएनए तंत्रज्ञान (रीकॉम्बिनंट डीएनए टेक्नोलॉजी) वरील अती जोखमीचे व       नियंत्रित शेती प्रयोगाच्या कामकाजाचे पुनार्वालोकन करणे.
3.     संशोधनासाठी व उपयोजनासाठी जनुकीय परिवर्तीत सजीवांचे उत्पादन, विक्री, आयात, निर्यात   व वापर याच्यावर बंदी किंवा निर्बंद संबंधीची कार्यप्रणाली प्रस्थापित करणे.
4.     वर्ग तीन जोखमीच्या प्रयोगासाठी योग्य परीबंधनिती चा विचार करून परवानगी देणे.
5.     एक एकरावर एक अशा वेगवेगळ्या शेती क्षेत्रावर जास्तीत जास्त वीस एकर क्षेत्रावर प्राधिकृत नियंत्रित क्षेत्रीय चाचण्या ह्या एका पिक हंगामासाठी घेण्यास परवानगी देणे.
6.     योग्य अशा व्यवस्थेत अंतरजनुकीय वस्तू विषयीची सुसंगत माहिती निर्माण करणे.
7.     जनुकीय परिवर्तीत सजीवांवर संशोधन सुरु करण्यापूर्वीच्या सुरक्षा उपाययोजना मार्गदर्शक        तत्वनुसार घेतल्याची पुरेशा खातरजमा तसेच जैवधोका निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्या प्रकल्पांच्या प्रयोगागत सोईसुविधाची पाहणी करणे.

·       जनुकीय अभियांत्रिकी मान्यता मंडळ
(Genetic Engineering Approval Committee – GEAC)
पर्यावरणाच्या दृष्टीने चांगल्या अशा उपक्रमांना उदारणार्थ जोखमीचे सूक्ष्मजीवाचा मोठ्या प्रमाणावर वापर व पुन: संयोजीत उत्पादनांचे संशोधन व उद्योग क्षेत्रात उत्पादन घेण्यासाबंधित मान्यता देण्याचे काम केंद्रीय पर्यावरण व अरण्य मंत्रालय च्या अंतर्गत जनुकीय अभियांत्रिकी मान्यता मंडळ करते.
हे मडळ खालीलप्रमाणे कामकाज पाहते.
१.   जनुकीय परिवर्तीत सजीवांचे व्यावसाईक दृष्ट्या मोठ्याप्रमाणावर वापरास व त्यापासून उत्पादन घेण्यास मान्यता देणे आणि त्याद्वारे पर्यावरणामध्ये त्यांचा प्रसार करणे.
२.  पर्यावरण व संरक्षण कायदा (EPA), १९८६, नियम १९८९ अंतर्गत जनुकीय परिवर्तीत सजीवांच्या संशोधनासाठी लागणाऱ्या कार्यप्रणाचा अंगीकार हा निर्बंध, उत्पादन, विक्री, आयात व वापरासाठी करणे.
३.  पर्यावरण व संरक्षण कायदा (EPA), १९८६, नियम १९८९ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्राधिकृत संस्था किंवा व्यक्तीची नेमणूक करणे.

•        राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान समन्वय मंडळ
(State Biotechnology Coordination Committee - SBCC)
जनुकीय परिवर्तीत सजीवांचा वापर व संशोधनावर बारकाईने विचार  व देखरेख करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये मुख्य सचिवाची नेमणूक करून राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान समन्वय मंडळची स्थापना केलेली आहे.

•        जिल्हा स्तरीय मंडळ
(District Level Committee - DLC)
१.      प्रत्येक राज्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय मंडळ हे सुरक्षा नियामांनावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारयुक्त विभाग म्हणून काम करते.
२.     जनुकीय परिवर्तीत पिकांच्या क्षेत्रावरील प्रयोगावर निरीक्षण व देखरेख करण्याचे काम राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान समन्वय व जिल्हा स्तरीय मंडळे हि आनुवंशिक हाताळणी पुनरावलोकन मंडळबरोबर करतात.


अमेरिकेत या जैवतंत्राने पिकविलेल्या सोयाबीनचे तेल आपण आयात करून खातो; पण ते सोयाबीन आपणाला चालत नाही किंवा पिकवत नाही, असे का? आपण उत्तम तंत्रज्ञान नष्ट तर करत नाही ना? हा प्रश्न जी. एम. पिकांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाने स्वतः ला विचारला पाहिजे. जी. एम. पिकांना परवानगी मिळेल किंवा नाही हा पुढचा प्रश्न आहे परंतु ह्या उत्तम तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यासाठी वेळोवेळी गठीत करण्यात येणाऱ्या शासकीय समित्यांच्या कामांमध्ये आपला विरोध आड येत कामा नये हीच एक इच्छा. अग्निपरीक्षा पार करूनही जर तंत्रज्ञान सामान्य शेतकर्यासाठी जर उपलब्द होत नसेल तर त्यामुळे त्या राष्ट्राचे मनुष्बळ, पैसा व वेळ गेल्यानंतर तेच तंत्रज्ञान इतर देशाकडून विकत घ्यावे लागेल किंवा इतर मार्गाने होणारी त्याची घुसखोरी कोणासही थांबवता येणार नाही.







प्रा. ऋषिकेश एच. औताडे (प्रभारी प्राचार्य), 
 प्रा. रमेश एम. जाधव व 
प्रा. प्रवीण एस. गायकर 
(कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी, राहता, अहमदनगर)
मो.: ९९६०५५३४०७
इ-मेल: rishikesh.autade@pravara.in