पूर्वीच्या सधन आणि समाधानी असलेल्या शेतकर्याची चुकलेली वाट सध्या आत्महत्ये पर्यंत येवून का ठेपली? जगाचा पोशिंदा आज उपाशी का? पूर्वीचे उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ट नोकरी हे समीकरण का बदलले? जगाची वाढती भूक, घटणारे शेतीखालील क्षेत्र व त्या पाठोपाठ पडणाऱ्या दुष्काळाचे सावट या समस्या ना फक्त शेतकरीच तोंड देणार का? त्याला ह्या ब्रम्ह संकटातून कोण सोडवणार?
वरील बहुतेक प्रश्नांचे उत्तर हे दुसरी हरितक्रांती ठरू शकते. पहिल्या हरितक्रांतीतील उणीवांचे उत्तर हे सुद्धा दुसर्या हरितक्रांती मध्ये दडलेले आहे. भारताचा कृषि क्षेत्रातील विकास खरे तर स्वातंत्र्यानंतर सुरु झाला, त्यामध्ये “हरितक्रांतीचा” मोलाचा वाटा होता. आधुनिक शेती तंत्रज्ञान, अधिक उत्पादन क्षमता असलेले वाण त्याच बरोबर रासायनिक खते, कीटकनाशके व सिंचनाचा वाढता वापर हरीत्क्रांतीस कारणीभूत ठरले.
तसे पाहिले तर जैवतंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ पहिल्या हरितक्रांतीच्या वेळी नकळतच रोवली गेली. त्यावेळी पहिल्यांदाच पारंपारिक संकरीकरनातून अपेक्षित व अचूक जनुके हस्तांतरित करून गव्हाचे उत्पन्न वाढविण्यात डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी यश मिळविले. १९६४ ते १९७० ह्या कालावधीत डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी त्यांच्या मदतीने नवीन व विकसित गव्हाचे वाण भारतामध्ये आणले, त्यामुळे भारताचे गव्हाचे सरासरी उत्पादन द्विगुणित झाल्यामुळे भारत हा गव्हाची आयात न करता निर्यात करणारा देश झाला. स्वातंत्र्य काळात अन्नटंचाईला सामोरे जाणाऱ्या देशाला या क्रांतीने अन्नाच्या बाबतीत सुबत्ता मिळून दिली. त्यावेळीसुद्धा गव्हाची हि नवीन विकसित वाणे भारतामध्ये अंतर्भूत करण्यास डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना स्थानिक शेतकऱ्यांकडून खूप विरोध झाला. विरोध इतका विकोपाला गेला कि भारत सरकारला त्यांमध्ये लक्ष घालणे भाग पडेले, व त्यानंतर डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचे संशोधन चालू झाले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, त्यामुळे एखादी नवीन गोष्ट येथे अंतर्भूत करायची झाल्यास त्यासाठी विरोध होतो. जसे कि, जैवतंत्रज्ञानाच्या वाट्याला हा विरोध त्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. हा विरोध भारतातच नव्हे तर जगभरात जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेल्या उत्पादनाला झाला. परंतु, जगातील बहुतेक देश आता हि उत्पादने वापरान्यास पुढे येत आहेत, त्यासाठी ह्या देशांनी जैवतंत्रज्ञान हे कसे सुरक्षित व उपयोगी आहे ह्याच्या प्रचारासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्या तुलनेत भारताला फार लांबचा पल्ला गाठायचा आहे.
जैवतंत्रज्ञानची व्याख्या: सजीवांमधील पेशीच्या गुणसुत्रांमध्ये किंवा त्याद्वारे चयापचय क्रियेत मानवाच्या गरजेनुसार सजीवाच्या सध्याच्या स्थितीत अथवा त्यात बदल घडवून उपयुक्त उत्पादने तयार करण्याच्या तंत्राला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. नवीन उपयुक्त जनुक शोधून ते शेतीउपयोगी सुधारीत पीक, प्राणी व सुक्ष्म जीव जातींमध्ये अंतर्भूत करण्यासाठीसुद्धा या तंत्राचा वापर केला जातो; त्यालाच कृषी जैवतंत्रज्ञान असे म्हणतात व त्यातून मानवनिर्मित फायदेशीर आणि सुधारित सजीवाला ‘जेनेटिकली
मोडीफाईड ऑरगॅनिज्म्स’ ( जी एम ओज) असे म्हणतात. उदा. भातामधील 'अ' जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्याच्या जनुकात बदल करून शास्त्रज्ञांनी 'गोल्डन राइस' ही जात विकसित केली. अतिउपयुक्त सजीव निर्मितीसाठी पेशीस्थरावर अपेक्षित गुणधारी जनुक ओळखून ‘अनुवंशिक अभियांत्रिकी” तंत्राच्याद्वारे सुधारणेस पात्र सजीवात अंतर्भूत करण्याचे तंत्र आतिशय क्लिष्ट व वेळखाऊ असते. संकर (हायब्रीड) तंत्रज्ञानाचा पुढचा आविष्कार म्हणजेच जैवतंत्रज्ञानद्वारे आनुवंशिक बदल (Genetic Manipulation/Modification) घडवणे.
कृषी जैवतंत्रज्ञानाचा पिकांमध्ये अंतर्भाव करणारे; भारत व ईतर राष्ट्रे.
भारत
|
अमेरिका
|
चीन
|
कॅनडा
|
ब्राझील, द. आफ्रिका, पराग्वे व अर्जेंटिना
|
बांगलादेश
|
|
कापूस
|
कापूस
|
अल्फाल्फा
|
कापूस
|
मका
|
कापूस
|
वांगे
|
मका
|
सालमोन मासा
|
पपई
|
सोयाबीन
|
मका
|
||
सोयाबीन
|
डांगर
|
पोरोसा पिंपल
|
मोहरी
|
सोयाबीन
|
||
मोहरी
|
पपई
|
टोमॅाटो
|
साखर कंद
|
|||
साखर कंद
|
सफरचंद
|
ढोबळी मिरची
|
||||