- लेखक: अंत्रे सुरेश हरिभाऊ व प्रा. औताडे आर. एच.
दिल्ली विदयापीठाच्या साउथ कैंपस स्थित सेंटर फॉर जेनेटिक मैनीपुलेशन ऑफ़ क्रॉप प्लांट्स या विभागामधे जैवतंत्रज्ञान विभाग,नवी दिल्ली ,भारत सरकार व राष्ट्रिय दुघ्ध विकास बोर्ड यांच्या आर्थिक साहयाने जी.एम्. मोहरीची निर्मिति करण्यात आली. पारंपारिक पद्धतीमध्ये संकरीत वाण हे एकाच प्रजातीच्या परंतू अनुवांशिक दृष्ट्या भिन्न असणाऱ्या पिकांमध्ये संकर करून तयार केले जातात. मोहरीमधे पुंकेसर आणि स्त्रीकेशर हे एकाच फुलामध्ये असल्याने ते पिकाला नैसर्गिकरित्या स्वयं परागसिंचित (Self pollinated) बनवतात. इतर पिकांप्रमाणे (उदा.कापूस,टोमॅटो,गहु इ.) मोहरीमध्ये नैसर्गिकरीत्या संकर होत नाही. यावर शास्त्रज्ञांनी पारंपारीक वनस्पति प्रजननशास्त्र व आण्विक प्रजननशास्त्र यांच्या मिलाफातुन उपाय शोधून काढला आहे. बारनेज-बारस्टार या जनुकांच्या सहाय्याने हे मोहरीमधे कृत्रिमरीत्या संकर करणे शक्य झाले आहे.
जनुकीय सुधारित संकरीत मोहरीच्या वाणासाठी प्रथम पेशिद्रव्र आधारित पुरुष वंध्यत्व (Cytoplasmic Male Sterile) असलेली ‘पूसाबोल्ड’ हि जात विकसित करण्यात आली. नंतर या जातीचे ‘अर्ली हिरा-२’ या पूर्व युरोपियन (Male Fertile) जातीबरोबर संकर करून जनुकीय सुधारीत ‘डी.म्.एच.-११’ हा वाण तयार करण्यात आला.
२००३ मध्ये सुरु झालेले संशोधन आज पर्यंत भारत सरकार हे सामान्य जनते पर्यंत पोहचू शकले नाही. खालील ताख्त्यामध्ये वेगवेळ्या सरकारी संस्थांनी जनुकीय सुधारित संकरीत मोहरीच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची कालक्रमानुसार माहिती दिली आहे.
दिनांक
|
कार्य/घटना
|
१७/०९/२००३
|
संकरीत डी.एम्.एच.-११ मोहरीची आर.सी.जी.एम्. च्या देखरेखी खाली दिल्ली येथे प्रक्षेत्र चाचणी. २००३-०४.
|
१७/०९/२००४
|
प्रायोगिक तत्वावर मोहरीच्या जनुकीय संकरीत (जनुके- बारनेज, बारस्टार, बार इ.) बियाण्यांचे उत्पादन. ठिकाण- जौन्ति, दिल्ली, रब्बी हंगाम २००४.
|
२८/१०/२००४
|
आर.सी.जी.एम्. ने सेन्टर फॉर जेनेटिक मॅनिपुलेषण ऑफ क्रॉप प्लांट्स (सी.जी.एम.सी.पी.),नवी दिल्ली ला या संकरीत मोहरीची प्रायोगिक प्रक्षेत्र चाचणी व संशोधनासाठी उत्पादन घेण्याची परवानगी दिली. ठिकाण- प्रक्षेत्र संशोधन केंद्र, जौन्ति, दिल्ली. रब्बी हंगाम, २००४.
|
१/१०/२००५
|
आर.सी.जी.एम्. ने सी.जी.एम.सी.पी ला आणखी वेग-वेगळ्या ठिकाणी संकरीत ‘डी.एम्.एच.-११’ च्या रब्बी हंगाम प्रक्षेत्र चाचण्यांसाठी परवानगी दिली.२००५-०६.
|
०८/०२/२००६
|
केंद्रीय देखरेख पथकाकडून जनुकीय सुधारीत मोहरीच्या आर.सी.जी.एम्. च्या प्रक्षेत्र चाचण्यांची तपासणी.
|
२५/०२/२००६
|
मोनिटोरिंग एंड एवलूषण कमिटी (एम.इ.सी.) ने डी.बी.टी.ला वेग-वेगळ्या ठिकाणी, २००६-०७ या कालावधीत प्रक्षेत्र चाचण्या घेण्याची शिफारस केली. या चाचण्या राष्ट्रीय मोहरी संशोधन केंद्र, भरतपूर, च्या देखरेखीखाली अखिल भारतीय समन्वित मोहरी संशोधन प्रकल्प (ए.आय.सी.आर.पी.एम्.) येथे घेण्यात आल्या.
|
०१/०८/२००६
|
आय.बी.एस.सी.ने आर.सी.जी.एम्.ला बारनेज-बारस्टार या जनुकीय सुधारीत मोहरीच्या संकरीत बियाण्यांचे उत्पादन, विविध प्रक्षेत्र चाचण्या घेण्यासंबंधी प्रस्ताव पाठवला.
|
३०/१०/२००६
|
आर.सी.जी.एम्. ने ‘डी.एम्.एच.-११’ या वानाच्या च्या वेग-वेगळ्या ठिकाणी प्रक्षेत्रावर चाचण्यांसाठी मान्यता देण्याची जी.ई.ए.सी. ला शिफारीश केली.
|
०६/०२/२००७
|
केंद्रीय देखरेख पथकाकडून जनुकीय सुधारीत मोहरीच्या आर.सी.जी.एम्. च्या प्रक्षेत्र चाचण्यांची तपासणी.
|
१०/०१/२००८
|
आर.सी.जी.एम्. कडून अॅलर्जी, आरोग्यविषयक व इतर पर्यावरणीय दृष्टा तपासणी करण्याची परवानगी.
|
२००८
|
जैविकदृष्ट्या सुरक्षित चाचण्यांसाठी मार्गदर्शक प्रणाली. (बी.आर.एल.-१ व बी.आर.एल.-२)
|
२०/१०/२०१०
|
जैविकदृष्ट्या सुरक्षित चाचणी-१ प्रथम वर्ष (बी.आर.एल.-१)- राजस्थान मधीलतीन ठिकाणी मर्यादित चाचणी घेण्यात आली. १). कृषी संशोधन केंद्र, प्रायोगिक प्रक्षेत्र, नवगाव. २). कृषी संशोधन केंद्र, श्रीगंगानगर, बिकानेर. ३).के.व्ही.के. कुम्हेर. ऑक्टोबर,२०१०.
|
१५/१०/२०१०/ व ३०/१०/२०१०
|
आर.सी.जी.एम्. आणि जी.ई.ए.सी. कडून बी.आर.एल.-१ (प्रथम वर्ष) चाचणी मधे करण्यात आलेल्या अन्न आणि खाद्य संबधित मुल्यांकनाला मान्यता.
जौन्ति, दिल्ली येथे प्रायोगित तत्वावर मर्यादित बियाणे उत्पादन.
बावना, दिल्ली येथे ऑक्टोबर,२०१० कालावधीत मोहरीचा पर्यावरणीय संरक्षित अभ्यास.
|
०७/०२/२०११
|
आर.सी.जी.एम्. कडून सी.जी.एम.सी.पी. दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली च्या Brassica juncea च्या पर्यावरणीय, परागकण प्रवाह व तुलनात्मक मूल्यांकन संबंधित कार्यप्रणालीस मान्यता.
|
२६/०७/२०११
|
बी.आर.एल.-१ चा प्रथम वर्ष चा अंतरिम अहवाल आर.सी.जी.एम्.ला सादर.
|
१२/३/२०१२
|
आर.सी.जी.एम्. ची बी.आर.एल.-१ साठीच्या द्वितीय वर्ष चाचण्यांसाठी कृषी विभाग राजस्थान ची मान्यता. तीन ठिकणी मर्यादित चाचणी घेण्यात आली. १). कृषी संशोधन केंद्र, प्रायोगिक प्रक्षेत्र, नवगाव. २). कृषी संशोधन केंद्र, श्रीगंगानगर, बिकानेर. ३).के.व्ही.के. कुम्हेर. रब्बी हंगाम २०११-१२.
बी.आर.एल.-१ द्वितीय वर्ष चा अंतरिम अहवाल आर.सी.जी.एम्. ला सादर .
|
२२/०४/२०१४
|
१३३ व्या मीटिंग मधे आर.सी.जी.एम्. ने जी.ई.ए.सी. ला रब्बी २०१४-१५ साठी बी.आर.एल.-२ साठी चाचणीची शिफारीश केली.
|
२८/१०/२०१४
|
जी.ई.ए.सी.कडून बी.आर.एल.-२ साठी रब्बी २०१४-१५ प्रक्षेत्र चाचणीसाठी परवानगी. प्रक्षेत्र- पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना व प्रादेशिक संशोधन केंद्र, भटिंडा (पंजाब)
|
०७/११/२०१४
|
जी.ई.ए.सी. कडून बी.आर.एल.-२ साठी रब्बी २०१४-१५ प्रक्षेत्र चाचणीसाठी परवानगी. प्रक्षेत्र-भारतीय कृषी अनुसंधान संस्थान (आय.ए.आर.आय.),नवी दिल्ली.
|
०९,१०,११/०३/२०१५
|
केंद्रीय पालन समिती (सी.सी.सी.) कमिटीची लुधियाना, भटिंडा व आय,ए,आर,आय., नवी दिल्ली. येथील जनुकीय सुधारीत मोहरीच्या प्रक्षेत्र चाचण्यांना भेट.
|
१५/०९/२०१५
|
जुनकीय सुधारीत मोहरीच्या ‘डी.एम्.एच.-११’ या वाण्याच्या संदर्भात जैविकदृष्ट्या सुरक्षेसंबंधी घेण्यात आलेल्या सर्व चाचण्यांचा अंतरिम अहवाल सर्व पुराव्यानिशी जी.ई.ए.सी. कडे सादर.
|
०५/०९/२०१६
|
अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार यांनी ०५/०९/२०१६ पासून ०५/१०/२०१६ पर्यंत रोजी जुनकीय सुधारीत मोहरीच्या ‘डी.एम्.एच.-११’ बद्दल संशोधन अहवालाचा खुलासा त्यांच्या वेबसाईट वर केला.
|
०७/१०/२०१६
|
न्यायालयाने जीएम मोहरी वाणाच्या व्यावसाईक लागवडीच्या प्रक्षेत्र चाचणीस १७/१०/२०१६ पर्यंत स्थगिती दिली व ती वाढवून २४/१०/२०१६ पर्यंत केली.
|
nice information and SC should give permission for the commercial trials.
ReplyDeleteछान पण कठिन काम!
ReplyDeleteअजित नरदे